आतापर्यंत 570 रुग्ण कोरोनामुक्त, 45 जणांचा मृत्यू
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 32 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1218 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तर आतापर्यंत 570 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचेही सांगण्यात आले आहे.
औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जयभीम नगर (5), गरम पाणी (2) रेहमानिया कॉलनी (2) कवरपल्ली, राजा बाजार (1), सुराणा नगर (1), मिल कॉर्नर (1) न्याय नगर (4), भवानी नगर, जुना मोंढा (2), रहीम नगर, जसवंतपुरा (1), पुंडलिक नगर, गल्ली नं. 10 (1), सातारा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (4), कटकट गेट (1), एन -2 सिडको (1), शिवाजी नगर (1), रोशन गेट (1), कैलास नगर (1),रवींद्र नगर, शहा बाजार (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 पुरूष आणि 14 महिला आहेत.
घाटीत दोघांना सुटी, दोन महिला रुग्णांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) औरंगाबाद शहरातील संजय नगरातील 41 वर्षीय महिला रुग्णाचा 21 मे रोजी दुपारी एक वाजता, बहादूरपुरा येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा 22 मे रोजी पहाटे 3.15 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीत आतापर्यंत 40 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांनी दिली. भडकल गेट येथील 50 वर्षीय पुरूष, इंदिरा नगरातील 40 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना आज घाटीतून सुटी देण्यात आली आहे. सध्या घाटीमध्ये 75 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 62 रुग्णांची स्थिती सामान्य आणि 13 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचेही त्यांनी कळवले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे, असे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे. तर महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अशा एकूण 45 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे, असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.
Leave a comment