औरंगाबाद । वार्ताहर
महावितरणच्यावतीने औरंगाबाद शहरात दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी शहराच्या विविध भागात विद्युत पुरवठा सलग तीन दिवस विविध वेळी बंद करण्यात येणार होता.
या काळात रमझान ईद असल्याने शहरातील मुस्लिम समुदायातील सर्व लोक हे घरीच ईद ची नमाज अदा करणार आहेत, म्हणून खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी महावितरणच्या निर्णयाची गंभीर दखल घेऊन अधिकार्यांना महावितरणकडून करण्यात येणारे दुरुस्ती व देखभालीचे सर्व कामे ईद नंतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महावितरणच्या अधिकार्यांनी दुरुस्ती व देखभालीचे सर्व कामे तत्काळ रद्द करून ईद नंतरच सर्व कामे करणार असल्याचे स्पष्ट केले, तसेच मुख्य अभियंता गणेशकर यांनी खा. इम्तियाज जलील यांना आश्वासित केले की, विद्युत पुरवठा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही याची दक्षता महावितरणकडून घेतली जाईल.
Leave a comment