खुलताबाद । वार्ताहर
कोरोनासारख्या महामारीचीच्या आजारामुळे भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्रात, गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊन चालू आहे. या महामारीमुळे सर्वच स्तरातून प्रत्येकाचे निश्चितच हाल, अपेष्ठा होत आहे. अनेक जीव हतबल झाले आहे यात सर्वच समाजातील गोरगरीब मोलमजुरी करणार्या माणसाच्या दुःखाला तर सीमाच उरली नाही. समाजातील प्रतिभावंत, कलावंत, पत्रकार, समाजसेवक, धम्म गुरू, बौद्ध भिक्षू, यांचे सुद्धा दुखणे निराळेच आहे सर्वसामान्य माणूस हा स्वाभिमानी असतो.
तो किती दुःख पचणार शेवटी बांध फुटतोच. जीवन जगण्याचाच जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा दुःख कोण समजून घेणार या महामारीच्या काळात ? पण समाजातील दानशूरता जागृत आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे खुलताबाद येथील सामाजिक वास्तवतेचे जाण असणारे नगरसेवक अब्बास बेग, दैनिक तरुण भारत या न्यूज पेपरचे खुलताबाद तालुका प्रतिनिधी संतोषराव करपे पाटिल आणि मावसाळा येथील प्रभाकर लाटे यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील, आपल्या उदरनिर्वाहासाठी ठेवलेल्या थोड्याफार धान्यातून थोडेसे धान्य, गहू आणि तांदूळ स्वतःला टू व्हीलर गाडी वर घेऊन विश्वशांती बुद्ध विहार बुद्धभूमी मावसाळा, येथील बौद्ध धम्मगुरु भदंत एस. प्रज्ञाबोधी (महाथेरो)यांची भेट घेऊन आस्थेवाईक पणाने विचारपूस करून सोबत आणलेले गहू आणि तांदूळ, भिक्षू संघाला दान देऊन यापुढे काही मदत लागली तर निसंकोच मनाने घरातील सदस्याप्रमाणे आपण आम्हाला हक्काने सांगावे असे सांगून भिक्षु संघाचा निरोप घेत असताना, धम्मगुरु भदंत एस.प्रज्ञाबोधी (महाथेरो) मावसाळा ता.खुलताबाद जि.औरंगाबाद यांनी मंगल मैत्रीचे आशीर्वाद दिला.
Leave a comment