पैठणकरांनी घाबरायची गरज नाही
पैठण । वार्ताहर
येथील शासकीय रूग्णालयातील कार्यरत असणारा कोरोना बाधीत परिचारकाच्या संपर्कातील 39 जनांचे अहवाल तपासणीअंती निगेटिव्ह आले असून पैठण करांनी मोकळा स्वास घेतला आहे . दि 21 रोजी कोरोना बाधीत परिचारक यांच्या संपर्कात आलेल्या 39 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असे त्याची तपासणी केली आहे .त्या तपासणीमध्ये सर्व 39 जनांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पैठण करांचे संकट तुर्तास टळलं आहे .यामुळे नागरिकांनी घाबरू नये सुरक्षीत रहावे असे अवाहन तहसिलदार चंद्रकांत शेळके , मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आदींनी केले आहे
घाबरू नका, सोशल डिस्टन्सिग पाळा
पैठण मधील नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही घाबरून जाऊ नये. तथापि, सोशल डिस्टन्सिगची सर्वांनी काळजी घ्यावी. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. चेहर्यावर नेहमी मास्क असावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवारी पैठण शहरातील सर्व मार्केट बंद
खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी शहरातील सर्व मार्केट बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला आहे. बससेवा सुरु होणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतील. घराबाहेर विनाकारण फिरणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस विभागास सूचित करण्यात आले आहे.
तपासणी नाक्यावर दक्षता
सर्व तपासणी नाक्यावरून ये-जा करणार्यांकडे परवानगी नसेल तर त्यांना परत पाठवण्यात येईल अथवा कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
औरंगाबादहून अपडाऊन करणार्यांना मुखालयी थांबणे बंधनकारक
विशेषतः औरंगाबादहून अपडाऊन करणार्यांनी मुखालयी थांबणे बंधनकारक आहे. अपडाऊन करणारे निदर्शनास आले तर कडक कारवाई करण्यात येईल. कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, बँक अधिकारी कर्मचारी यांनाही ही बाब लागू असेल.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 54 व दुपारी सहा रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179 झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळवली आहे.
Leave a comment