भराडी । वार्ताहर
प्राथमिक आरोग्य केंद्र पालोद अंतर्गत वांगी बुद्रुक येथे महसूल व ग्राम विकास राज्य मंत्री महाराष्ट्र शासन मा नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या संकल्पनेतून कोरोना कोविड-2019 महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत कोरोना स्क्रीनिंग सर्व्हे करीता वैद्यकीय सेवा आपल्या दारी व डॉक्टर आपल्या दारी मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला असुन वांगी बुद्रुक येथे बुधवार रोजी डॉक्टर दुधे,डॉक्टर किरण सोनवणे डॉक्टर दिपक काटकर,तलाठी आरती माने,ग्रामसेवक एल आर कोळी यांनी भेट देऊन संपुर्ण गावक-यांच्या घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी करून त्यांना कोरोणा केव्हीड 19 या आजाराविषयी माहीती देऊन जनजागृती करण्यात आली .यावेळी पोलीस पाटील चंद्रकांत जाधव,आशा सेविका संगीता शिंदे,अंगणवाडी सेविका मंजुषा कुलकर्णी,वैशाली काकडे,मदतनीस ताराबाई काकडे,कौसाबाई शेंद्रे यांनी मदत केली.यावेळी गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment