सोयगाव येथे शासनाच्या आधारभूत किमतीने मका, ज्वारी व बाजरी खरेदी केंद्राचे ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ
सोयगाव । वार्ताहर
तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेकर्यांसाठी शासनाच्या किमान आधारभूत किंमतीत एफएक्यु दर्जाची मका , ज्वारी, बाजरी खरेदीचा शुभारंभ राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला. गुरुवार दि.21 रोजी सोयगाव येथील शासकीय गोडावून येथे मका, ज्वारी, बाजरी खरेदीचा शुभारंभ पार पडला. खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र राठोड, माजी जि. प. सदस्य प्रभाकरराव (आबा) काळे, तहसिलदार प्रवीण पांडे, नायब तहसिलदार व्ही.टी.जाधव, एन.के.मोरे, ख.वि.संघाचे शांताराम देसाई यांच्यासह मिलिंद पगारे, कैलास पाटील, दिलीप देसाई, कृ.उ.बा.समितीचे सुनिल गुजर, विष्णू मापारी, भागवत म्हस्के, गोडाऊन किपर एस.बी.ताले,भगवान वारंगणे, रमेश गव्हांडे, संतोष बोडखे, शरीफ शहा,शेख बबलू, समाधान काळे, दिपक बागूल,अरूण सोहणी,एकनाथ गव्हाड तसेच शेतकर्यांची उपस्थिती होती.
सोयगाव येथे जिल्ह्यात सर्वात प्रथम भरड धान्य खरेदीची सुरुवात करण्यात आली असून सोयगाव येथे जिनिग नसल्याने शेंदूर्णी आणि पाचोरा येथे सीसीआयच्या माध्यमातून शासकीय दराने कापूस खरेदी सुरू आहे. प्रत्येक शेतकर्याकडे उपलब्ध असलेला कापूस खरेदी केल्याशिवाय कापूस खरेदी बंद होणार नाही अशी ग्वाही ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. सिल्लोड- सोयगाव तालुक्यात मका उत्पादक शेतकर्यांची मोठी संख्या आहे गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मक्याचे चांगले उत्पादन हाती आले . शिवाय रब्बी हंगामातही बर्याच क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली होती . लॉकडाऊनमुळे मकाला गुणवत्ता असूनही पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नव्हता, महाराष्ट्र शासनाने आता मका ज्वारी तसेच बाजरी शासकीय आधारभूत किमतीत खरेदी सुरू केल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. राज्य सरकारच्या निर्देशानुसार खरेदी - विक्री संघा मार्फत सोयगाव येथे शासनाच्या आधारभूत किमतीने मका, ज्वारी, बाजरी खरेदी सुरू करण्यात आली आहेत. सोयगाव तालुक्यात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड औरंगाबाद मार्फत एफ ए क्यू दर्जाची मक्याची खरेदी केली जाणार आहे. यासाठी त्यांनी नोंदणीसाठी हींींिी://षेीाी.सश्रश/ीउिइउूक्
Leave a comment