तांदूळ कुठे वाटप तर कुठे गायब...गरींबाची डाळ कुठं हाय
पाचोड । विजय चिडे
देशात कोरोणाचा थैमान सुरूच आहे.या कोरोणाचा संसर्ग वाढून नये या करिता प्रसाशन सज्ज झालेले आहे त्याकरिता प्रसाशनाकडून वेळोवेळी लाँकडाउन जाहीर करण्यात येत आहे.तसेच दिवसेंदिवस कोरोणाचे रुग्ण वाढत च चालेले आहे हा आजार कुठं तरी आटोक्यात यावे, त्याकरिता प्रशासन विविध शक्कल चालवत आहे.तसेच आत्ता पंर्यत देशात चौथ्यादां शासनाने लाँकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर बेरोजगारीची कुर्हाड पडली आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्या नागरीकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला मात्र;या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत पैठण तालुक्यातील अनेक कुटुंबांना मोफत तांदूळ मिळाल्याचा मोठा आधार मिळाला आहे. मात्र असे,असले तरी हा तांदूळ सर्वांना नाही मिळाले शिवाय डाळही वाटप करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोफत चा तांदूळ आणि डाळ कुठे हा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाउन व संचारंबदी असल्याने सर्वसामान्य नागरिकांना रोजगार नाहीत तसेच अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहे तसेच मंजूर नाही त्यामुळे हातावर पोट असणार्या पुढे आपल्या टिच भर पोट भरण्यासाठी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत मोफत तांदूळ देण्यात येत असल्याने उपजीविकेचा प्रश्न सुटला जात आहे परंतु याच काळत पंतप्रधान योजनेच्या अतंर्गत पैठण तालुक्यातील अनेक शिधापत्रिका धारकांना तांदूळ व डाळ देण्यात आलेली नाही ज्यांना शिधापत्रिका नाहीत असे नागरिकांना व केसरी कार्ड मोफत दिली नाही. त्यामुळे ही डाळ व तांदूळ सर्वांनाच द्यावे अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे.काही लोकप्रतिनिधीनी मोफत डाळ देण्याची घोषणा केली होती,मात्र ही डाळ अद्यापही कार्डधारकांना न आल्याने डाळ कधी मिळते याची वाट पहात आहेत.या बाबत पैठण येथिल पुरवठा विभागाच्या नयाब तहसिलदार कोमल मनोरे यांना चारच्या दरम्यान दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी हा संपर्क क्षेत्राबाहेर दाखवत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने रशेन दुकानदार मोफत रेशन वाटप करण्याची आदेश दिले आहे.परंतु मुरमा येथिल रेशन दूकांनदाराकंडुन आम्हाला आजूक ही डाळ वाटप झालेली नाही. तांदूळ देखिल एक वेळेस वाटप करण्यात आले आहे.शासनाने तिन महिने मोफत रेशन करण्याचे सांगितलं असले तरी आम्हाला हे मिळालेले नाहीत.मंग आमच्या हक्काची डाळ कुठं हाय.
बंडू चिडे ग्राहक मुरमा.
Leave a comment