परठिकाणाहुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती प्रशासनास द्यावी
जालना । वार्ताहर
जुना जालना परिसरातील एका खाजगी रुग्णालयातील चार तर नवीन जालना परिसरातील एका खाजगी रुग्णालयातील एक असे एकुण पाच कर्मचा-यांचे स्वॅब, मुंबई येथुन परतलेल्या मुळची पेवा ता. मंठा येथील रहिवाशी असलेल्या व कोव्हीड सेंटर येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या 26 वर्षीय महिलेचा अहवाल दि. 15 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता, याच महिलेच्या निकट सहवाशीतात आलेल्या पेवा ता. मंठा येथील एका व्यक्तीच्या स्वॅबचा, मालेगांव येथुन परतलेल्या व भोकरदन येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रं.3 च्या एका जवानाचा अहवाल, मुंबई येथुन परतलेली मुळची टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील रहिवाशी असलेली 45 वर्षीय महिला कोव्हीड सेंटर टेंभुर्णी येथुन दि. 19 मे 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना या ठिकाणी उपचारासाठी पाठविले होते. त्यांचा स्वॅबचा अशा एकुण आठ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडुन दि. 22 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांनी दिली.
दि. 4 मे, 2020 नंतर जालना जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पहाता शहरात, गावात रेड झोन मधुन येणा-या नागरिकांनी स्वत:हुन पुढाकार घेऊन आपण ज्या ठिकाणावरुन प्रवास करुन आला आहात, याची माहिती प्रशानास द्यावी. तसेच पुर्णपणे होम क्वारंटाईनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जर काही लक्षणे आढल्यास याची माहिती प्रशासनास द्यावी. जर काही लक्षणे आढल्यास अशा नागरीकांनी तात्काळ आरोग्य विभाग किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण 1912 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 47 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 935 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 26 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1849 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -08 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 52 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1767, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 329, एकुण प्रलंबित नमुने -26 तर एकुण 888 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या- 08, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 793 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या- 09, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -433, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-12, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -47, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -165, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1706 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 218 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 8533 असे एकुण-8751 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-2728, मध्यप्रदेश -782, बिहार 1020 तेलंगणा- 27, राजस्थान-167, झारखंड - 30, आंध्रप्रदेश-103, ओरिसा- 113, छत्तीसगड- 10, हैद्राबाद-08 असे एकुण-4988 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे. कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 433 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-26, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -11, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-22,पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -44 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-15, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-46 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -102, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-18, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे - 45, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-37, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-01,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-34 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 637 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 118 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 598 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 92 हजार 530 असा एकुण 3 लाख 18 हजार 838 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment