मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची माहिती

जालना । वार्ताहर

पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. पावसाळ्याच्या कालावधीत विविध प्रकारच्या जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. या कारणाने जिल्हा परिषद जालना तर्फे पावसाळ्याच्या पार्स्व्भूमीवर जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभियान स्वरूपात दिनांक 26 मे ते 30 जुन 2020 या कालावधीत जिल्ह्यात खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. सदर अभियानामध्ये जे ग्रामसेवक, अधिकारी कर्मचारी सक्रीय सहभाग नोंदविणार नाही, पाणी नमुना प्रयोगशाळेस सादर करणार नाही व ज्या गावातील पाणी पाणी नमुना दुषित येईल त्या संबंधित कर्मचा-यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी दिली आहे.

क्लोरीन वॉश अभियान. (ग्रामसेवक/जलसुरक्षक) कालावधी - 26 ते 31 मे 2020       जिल्ह्यातील सर्व गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची/जलकुंभाची आतून व परिसर साफ सफाई करणे, सार्वजनिक विहीर व पाणी पुरवठ्याची विहिरीमध्ये पडलेला कचरा काढणे, सविस्तर सुचना देण्यात आलेल्या आहेत.  सदर अभियान मुदत दिनांक 26 मे ते 31 मे 2020 राहील. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची नियमित पाणी शुद्धीकरण करणे पाणी नमुने दुषित आढळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आले आहे. अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान) ग्रामसेवक / जलसुरक्षक) कालावधी - 01 जुन ते 30 जुन 2020

जिह्यातील सर्व गावातील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची व काही नळ कनेक्शन च्या पाण्याची अनुजैविक तपासणी ग्रामसेवक यांनी आपल्या तालुक्याला नेमून दिलेल्या प्रयोगशाळेकडूनच  करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर सुचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. अनुजैविक तपासणी अभियान मध्ये एकही गाव वाडी वस्तीचा पाणी नमुना तपासणी पासूनराहू नये याबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.  तपासणी अंती प्राप्त अहवालानुसार पाणी नमुना दुषित आढळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येणार आहे. उपरोक्त दोन्ही अभियान दिनांक 26 मे ते 30 जुन 2020 या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. अभियानाअंती सर्व गटविकास अधिकारी यांचा अभियान विषयक आढावा नियोजित आहे. सदरील अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी ग्रामसेवक जलसुरक्षक यांना देण्यात आली आहे. या अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.अनुपमा नंदनवनकर, श्रीम.नम्रता गोस्वामी, श्री.भगवान तायड, श्री संजय डोंगरदिवे, श्री ऋषिकेश जोशी, श्री हिमांशू कुलकर्णी, श्री जय राठोड, श्री. श्रीकांत चित्राल श्री.शुभम गोरे हे परिश्रम घेत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.