जालना । वार्ताहर
सर्व महाविद्यालय प्राचार्य, महाविद्यालये, विद्यार्थ्यांना संस्था प्रमुखांनी आपल्या महाविद्यालय, संस्थेत सन 2019-20 शैक्षणिक वर्षात प्रवेशित अनु- जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी ज्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच विद्यावेतन योजनेचे अर्ज ऑनलाईन प्रणाली हींींि://ारहरवलींारहरळीं.र्सेीं
सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था प्रमुखांनी सन 2019-20 शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन नोंदविलेल्या अर्जापैकी परिपुर्ण स्वरुपात पात्र अर्ज मंजुर करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या लॉगिनवर पाठविण्यासाठी दि. 26 मे, 2020 ही अंतीम तारीख असल्याचे ऑनलाईन प्रणालीवर कळविले आहे. सदरील अर्जापैकी त्रुटीचे अपात्र मंजुर केल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केल्या जाईल. तसेच अनुसुचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत मंजुर झाले नसल्याने शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य पुर्णत: जबाबदार राहतील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित व्दितीय टप्प्याची उपस्थिती नोंदवुन मंजुरी बाबत ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज या कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्यात यावेत, असे आवाहन कार्यलय अधीक्षक, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.
Leave a comment