कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव बस स्थानकात ता.22 मे शुक्रवार रोजी बस स्थानकात बस दाखल झाली नंतर लॉकडाऊन नंतर पहिल्याच दिवशी बस आल्याने बस स्थानकात प्रवासी नसल्याचे दिसून आले बसमध्ये प्रवासी नसल्याने बस रिकाम्याच होत्या ,अंबड -कुंभार पिंपळगाव बस मधून एकच प्रवासी गाडीतून उतरला होता. बाजारपेठेत डाऊन नंतर बस येताच सर्वांचे लक्ष बस कडे लागले होते बस स्थानकात बस येताच आजूबाजूच्या नागरिकांच्या चेह-यावर आनंद दिसून आला .कोरणा विषाणू आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 23 मार्च पासून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या घोषणेनंतर जनता कर्फ्यु लावण्यात आला होता सर्व व्यापार उद्योगधंदे ठप्प झाले होते सर्व सामान्य नागरिकांचे मोठे यामध्ये नुकसान झाले व दैनंदिन जीवनाची मध्ये अनेकांचे हाल झाले चौथ्या लॉकडाऊन मध्ये आत्य आवश्यक सेवा सह काही दुकानदारांना सकाळी नऊ ते दोन या काळात उघडण्याच्या आदेश देण्यात आलेले होते.
चौथ्या लोक डाऊन मध्ये काही दुकानदारांना 22 पासून सकाळी नऊ 9 ते 5 या वेळात दुकाना उघडण्याच्या परवांगी देण्यात आली .काही दुकांनदारांनी ता. 22 पासुन दुकाना सुरू केल्या होत्या . कुंभार पिंपळगाव बाजार पेठे दुकाना उघडल्या होत्या व शुक्रवारी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती बससेवाही सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान वाटले होते परंतु कोरोना विषाणू आजार वाढत असल्याने काही नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण कायम असल्याचे दिसून येत होते.
Leave a comment