बीड | वार्ताहर
जिल्ह्यातील नागरीकांनी पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, ट्रक चालक, क्लिनर व इतर अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांना त्यांच्या गावात येण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व वरील संबंधित व्यक्तींचे कामाचे स्वरूप पाहता त्या सर्वांना होम क्वाॅरंटाईन करणे शक्य होणार नाही परंतु हे कर्मचारी त्यांचा गावात किंवा राहण्याच्या ठिकाणी गेल्यास त्यांनी स्वतः सर्व कोरोना संसर्ग सुरक्षेचे नियम पाळावेत अशाही सूचना ही जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.
आज सर्व बँका सुरू ठेवाव्यात
बीड जिल्हयातील सर्व बँका आज दि. २३ मे २०२० रोजी संचारबंदीच्या शिथिल कालावधीत नागरिकांसाठी चालू ठेवाव्यात. सुट्टींच्या कारणामुळे बाधा येवू न देता या बँकांचे कामकाज चालू ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे.जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात विषम दिनांकास संचारबंदीतुन सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळेत शिथिलता देण्यात आलेली आहे . केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार २३ मे रोजी चौथा शनिवारनिमित्त सुट्टी असून या विषम दिनांकास बैंका बंद राहिल्यामूळे सदर परिस्थितीच्या कालावधीत लोकांना आर्थिक व्यवहार करणेस अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सदर आदेश दिले आहेत.
Leave a comment