पैठणमध्ये कोरोना रोगाचा शिरकाव ; शहरात पसरले भितीचे वातावरण 

पैठण । नंदकिशोर मगरे 

येथील शासकीय रूग्णालयात कार्यरत असलेला परिचारक ब्रदरचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला असून त्याच्या संपर्कात 81 जन आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून अखेर पैठण शहरात कोरोनाने परिचारकाच्या रूपाने शिरकाव केल्याने नागरिकात प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले आहे. पैठण येथील शासकीय रूग्णालयात कार्यरत असणा-या ब्रदरने दि 15 मे पर्यंत पैठण येथे कार्य बजावले आहे .तदनंतर लॉकडाऊन अधिक कडक केल्याने त्यांनी रजा घेतली व काल दि 20 रोजी त्यांना त्रास होत असल्याने दवाखान्यात गेले असता त्यांची चाचणी घेतली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात तब्बल 81 जण आले असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान गेल्या दोन महिण्या पासून औरंगाबाद शहरात कोरोना बाधीत रूग्णाची झपाट्याने वाढ होत असल्याने पैठणकडे कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून औरंगाबादहून पैठणला येणा-या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी हजर राहण्याची विनंती निवेदन तहसिलदार यांना दिले होते .त्या धर्तीवर तहसिलदार यांनी सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालयी हजर राहण्या बाबत नोटीस बजावल्या होत्या मात्र सर्व नियम व तहसिलदार यांच्या  आदेशाची  पायमल्ली करत काही महाभाग आजही औरंगाबाद येथून ये जा करत आहेत .त्यातच शासकीय रूग्णालयात परिचारक पदावर कार्यरत असलेल्या ब्रदरने देखील हाच प्रकार करत पैठण करांचा जिव भांड्यात टाकून मोकळा झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आतातरी ये-जा करणार्‍या अधिकारी, कर्ममचारी यांच्यावर अकुंश बसेल काय ? याकडे पैठणकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.