बसमधे आसन क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवाशी प्रवास करणार-हिरालाल ठाकरे
सोयगाव । वार्ताहर
कोरोना-19 संक्रमण रोकण्यासाठी गेेेेल्या दीड ते दोन महीण्यापासुन प्रवाशांच्या सेवेत असलेली राज्य परिवहन मंडळाची सेवा बंंद करण्यात आली होती.शुक्रवार (दि.22) पासुुन प्रवासी सेेेवा सुरु करण्यात येत आहे. सोयगाव येथुन फर्दापुर मार्गे सिल्लोड चार फेर्या,सोयगाव हळदा मार्गे गोळेगाव दोन फेर्या तर सोयगाव बनोटी मार्गे नागदपर्यंत अशा तीन फेर्या शुक्रवार पासुन प्रवाशांच्या सेवेत धावनार आहेत. दळण-वळणाला चालना मिळनार आहे.
प्रवाशांनी प्रवासा दरम्याण मास्क लावने अनिवार्य आहे. शासनाने दिलेल्या सुचनाचे काटेकोर पालन करायचे आहे. कोरोना विषाणूचे संसर्ग होवू नये करीता बस स्वच्छ व निर्जतुकीकरण करण्यात येणार, प्रवाशांनी सामाजीक अंतराबाबत असलेल्या सुचनाचे पालन करायचे आहे. जिल्हा आगार व्यवस्थापक यांच्या आदेशावरुन सद्या सिल्लोड,गोळेगाव, नागद या गावांसाठी बस फेर्या शुक्रवार पासुन सुरु करण्यात येत असुन हा आदेश 30 मे पर्यंत आहे.पुढील आदेश मिळाल्या नंतर टप्या टप्याने बस सेवा पुर्व पदावर येईल,सोयगाव पंचक्रोशीत प्रवाश्यांनी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोयगाव आगार प्रमुख हीरालाल ठाकरे यांनी केले.
Leave a comment