बाहेरून आलेल्या लोकांची करतात तपासणी
विहामाडंवा । वाार्ताहर
पैठण तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचा दारोदारी जावून आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आरोग्य सर्वेक्षण करीत आहेत. केवळ सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असे नाही, तर कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना आणि शासनाने दिलेले आदेश त्या घरोघरी पोहचवित आहे. आजच्या घडीला तालुक्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नाही, त्यात या महिलांच्या कामाचे योगदान देखील आहे.
शासन अत्यंत गांभीर्यपूर्वक कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पैठण प्रशासन देखील तितक्याच तत्परतेने या समस्येवर मात करण्यासाठी लढत आहे. या लढाईच्या आघाडीवर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आरोग्य कर्मचारी आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू आहे, प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन आजारी व्यक्ती किंवा लक्षणे आढळून आल्यास तातडीने आरोग्य विभागाला माहिती देण्यात येते.
प्रतिक्रिया
घरोघरी जावून सर्वेक्षण केले सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम करताना समाधान वाटले.पुणे, मुंबईतून आलेल्या नागरिकांना गांभीर्य लक्षात आणून दिले. तसेच 14 दिवस घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या. यासमीन शेख(अंगणवाडी सेविका,विहामांडवा) प्रत्येक गृहभेटीत नागरिकांनी सहकार्य केले, वस्तुस्थितीनुसार माहिती दिली.प्रत्येकाला आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना सांगितल्या.गुलशान शेख (आशा वर्कर,विहामांडवा)
Leave a comment