औरंगाबाद । वार्ताहर
आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या मान्यतेनुसार ज्याची, रोगप्रतिकारशक्ती जास्त असते त्यांना संसर्ग आजार होत नाही. या उद्देशाने भारतीय डाक कर्मचारी संघातर्फे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषधी अर्सेनिक अल्बम-30 औषधांचा तीन दिवसाचा एका परिवाराला पुरेल इतक्या प्रमाणात डोस विनामूल्य पुरवण्यात आलेला आहे. हा डोस तीन दिवस सकाळी उपाशीपोटी प्रत्येकी चार गोळ्या व दोन वर्षाखालील मुलांनी दोन गोळ्या घ्यायच्या आहे, तसेच गोळ्या घेण्याच्या आधी किंवा नंतर अर्धा तास काहीही खाऊ अथवा पिऊ नये.
हा उपक्रम राबवण्याची संकल्पना संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी तथा राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य वेल्फेअर बोर्डाचे सदस्य श्री प्रकाश कुलकर्णी यांची होती. या उपक्रमास अमूल्य असे सहकार्य डॉक्टर माधवी जोशी व आबासाहेब देशमुख यांचे लाभले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टपाल कार्यालयातील विविध पदावर कार्यरत असलेले पदाधिकारी तसेच अधिकारी यांचेही मोलाचे असे सहकार्य लाभले आहे. हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री शेख शकील, कल्याण पाटील, एम पी पंडित (सिडको कॉलनी) , हरिचंद्र नागरगोजे, लक्ष्मण घोडके,राजेंद्र खरे, डीडी कुलकर्णी,अंकुश मदन, स्वप्निल पवार, स्वप्निल तूपशेंद्रे, रामेश्वर दाभाडे, अमोल बेंडे,इरफान अन्सारी, प्रकाश जाधव,नासेर शेख, पंडित मोरे, अनघा कुलकर्णी, प्राची पातुरकर, शुभांगी मोघे, रंजना मुंडे ,सुनिता देशमुख, आरती मनसटवार, वैशाली ढोरे, डॉ. सुहास कडभणे, रंजीत चव्हाण (असिस्टंट सर्कल सेक्रेटरी), राजेंद्र घुगे व राजेश जंजाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Leave a comment