आष्टी । वार्ताहर
परतुर तालुक्यातील आष्टी हे चाळीस खेड्यातील सर्वात मोठे बाजारपेठ समजल्या जात असून सर्कल मधील सर्व ग्रामस्थ हे आपापल्या कामानिमित्त येत असतात मात्र राज्यात कोविड 19 होत असुन तो प्रादुर्भाव रोखण्याकामी आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.बी सानप व सर्व पोलीस स्टाफ यांनी व्यापार्यांना सूचना देत योग्य वेळेत योग्य भावात आणि सोसिअल डिस्टंसिंग पाळूनच सर्कल मधील व्यक्तींना शेतकर्यांना नियमांचे पालन करून अत्यावश्यक वस्तूंची विक्री करा अश्या सूचना दिल्या असुनही व्यापारी मात्र सोसिअल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस हे 24 तास जनतेचा सांभाळ करण्यासाठी धडपड करत असुन पोलीस प्रशानाला सहकार्य करणे कर्तव्य नाहीय का अशे जनतेत बोलल्या जात आहे. इतकच नाही तर चढ्या भावाने वस्तूंची विक्री करत असल्याचे ही आढळून येत आहे. असे घडत असल्याने व्यापार्यांनाच सूचनांचे पालन करायचे नाही का किंवा त्यांचा असाच मनमानी कारभार चढ्या भावाने विक्री याला आळा बसणार नाही का? अशे प्रश्न यावेळी जनतेत निर्माण होत असल्याचे ऐकायला येत आहे.
Leave a comment