समाज बांधवांनी घरात राहूनच जयंती उत्साहात साजरी करावी-नंदकुमार गांजे
आष्टी । वार्ताहर
तमाम धनगर बांधवांना माहिती साठी सांगू इच्छितो की,दरवर्षी आपण समस्त धनगर समाजाचे श्रद्धास्थान किंवा दैवत असलेल्या लोकमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्म स्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंढी या छोट्याशा गावा सहित संपूर्ण महाराष्ट्रातील गावा-गावात, वाड्या-वस्तीवर प्रचंड प्रमाणात जयंती 31 मे रोजी साजरी करीत असतो.
पण या वर्षी अहिल्यामाईच्या जयंती वर कोरोनाचे सावट असल्यामुळे लॉक डाऊनच्या काळात कुठलाच सार्वजनिक कार्यक्रम मग त्यामध्ये लग्न, मरणे, तेरवी, मेळावे, मोर्चे, आंदोलने, वाढदिवस एवढेच नाही तर जयंती,पुण्यतिथी वर सुद्धा प्रतिबंध लावल्यामुळे आपल्या अहिल्यामाईची जयंती सुद्धा सार्वजनिक स्वरूपात साजरी करता येणार नाही.मग अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना माझी नम्र विनंती आहे की, प्रत्येकाने आपापल्या घरात राहूनच जयंती साजरी करता येईल.मग त्या मध्ये प्रत्येक समाज बांधवांनी आपापल्या घरा घरातच आभिवादन करून प्रत्येकाने पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांची जयंती साजरी करावी.जेणे करून आपल्या पुढच्या पिढीला इतिहास कळेल. आणि घरात सुद्धा एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण तयार होईल.हे करीत असताना समाज बांधवांनी सोशल मीडियाचे माध्यमातून जयंतीची जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी.
Leave a comment