एसबीआय बँकेचे नियोजन कोलमडले नागरिकांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पैशासाठी बँकेत अलोट गर्दी
पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव .रेणुकाई पारध वालसावंगी. गावात सर्वच दुकाने उघडे राहत असून सोशल डिजीजनचा फज्जा उडाला आहे वालसावंगी येथे तर गर्दीने कहर केला आहे.हे गाव भोकरदन तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असल्याने गावात कापड दुकान, बुट हाऊस , सह सर्वच दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच तालुक्यातील आन्वा येथे खुप मोठी लोकसंख्या असलेल्या गावात कोरोना पाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण भागातील जनतेला याबाबत कसलेही गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे.मला कुठे कोरोना होणार या भ्रमात सध्या नागरिक सगळीकडे फिरकत आसुन बँकेत तर पैशासाठी अलोट गर्दी होत असल्याने संचारबंदीचे उल्लंघण होत आहे.यावर बंदोबस्त करण्यासाठी असलेल्या पोलीस प्रशासनाची माञ मोठी दमछाक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च देशभरात लाँकडाऊनचे बंधन पाळण्यात येत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नसल्याने यात शासनाची मोठी डोकेदुखी वाढत चालली आहे.यासाठी नागरिकांनी आता दक्ष राहुन आपली काळजी स्वतःहाच घेऊन संचारबंदीचे उल्लगंन न करता प्रशासनाला सहकार्य करावे अशा सुचना वारंवार शासनाकडुन देण्यात येत आहे. माञ ग्रामीण भागातील नागरिक शासन आदेशालही जुमानत नसल्याचे चिञ प्राप्त परिस्थितीवरुन दिसत आहे.तालुक्यातच पारध व आन्वा या दोन गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतरही प्रशासनाने आता तरी नागरिकांनी सावध रहावे याबाबत जनजागृती करुन तशा सुचना दिल्या जात आहे. कोरोनाची लागण आपल्या गावाजवळ जवळ येऊन ठेपली असली तरी नागरिक बिनधास्त वावरत आहे.दरम्यान शासनाने कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध बँकात संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,पिक विमा,दुष्काळी अनुदान असे विविध प्रकारचे अनुदान जमा झाले आहे.हे अनुदान काढण्यासाठी नागरिक जिव धोक्यात घालून बँकात माञ अलोट गर्दी करीत आहे.प्रशासनाने वारंवार सांगून देखील काहीच उपयोग होत नसल्याने पैशासाठी नागरिक स्वताच्या जिवाची पर्वा न करता गर्दी करतांना दिसत आहे.सध्या बाहेरून येणारे बरेच अनेक नागरिक गावातच काँरनटाईन करण्यात आले असले तरी यातील बरेच जण गावात बिनधास्त वावरत आहे.यापासून देखील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.कोरोनाच्या सुरूवातीला नागरिकांनी काही प्रमाणात घरी राहणे पंसद केले.माञ आता कोरोना प्रादुर्भाव तिसर्या टप्प्यात आला असताना देखील नागरिक घराबाहेर सुसाट फिरु लागले आहे. स्थानिक पातळीवर ग्रामपचांयत,पोलीस प्रशासन यांच्याकडून जनजागृती केली जात आहे. माञ याकडे ग्रामीण भागात नागरिकांचे फारसे लक्ष नसल्याचे चिञ आहे. आपल्याला कुठे होणार कोरोना.सध्या कोरानाचा उद्रेंक दिवसेंदिवस वाढत चालला आहे.माञ नागरिक कोरोना सारख्या महामारी रोगाला अतिशय सहजपणे घेऊ लागले आहे.पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग, ग्रामपचांयत आदीकडून युद्धपातळीवर जनजागृती करुन देखील नागरिक जे करायचे तेच करीत आहे.आपल्याला कूठे होणारा कोराना या आविर्भावात ते कुठेही सार्वजनिक ठिकाणी जाऊन गर्दी करत आहे.......
...लॉकडाउन साठी शिथिलता देण्यात आली याचा अर्थ गर्दी करायची असा होत नाही. सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी शिथीलथा देण्यात आली आहे .जर कोणी अशा प्रकारे बँकेच्या समोर सोशल डिस्टंन्सचे पालन करणार नसेल तर बँक व्यवस्थापकासह नागरिकावर सुद्धा करावी करावी लागेल नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे पोलीस ठाणे पारध
Leave a comment