औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 44 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1120 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलिस कॉलनी (2), लिमयेवाडी, मित्र नगर (1), शरीफ कॉलनी (1), न्याय नगर, गल्ली न.1 (1), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (3), मराठा गल्ली, उस्मानपुरा (2), कैलास नगर, गल्ली नं.2 (3), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.5(2), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (2), इंदिरा नगर (1), खडकेश्वर (1), माणिक नगर (1), जयभीम नगर (4), पुंडलिक नगर (5), जिल्हा सामान्य रुग्णालय (1), संजय नगर (1), सिटी चौक (1), बालाजी नगर (1), आझम कॉलनी (1), असेफिया कॉलनी (1), रहेमानिया कॉलनी (1), टॉऊन हॉल (1) आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (2), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे.
घाटीमध्ये तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज औरंगाबाद शहरातील रेहमानिया कॉलनीतील 50 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा सकाळी साडेपाच वाजता, इंदिरा नगरातील 80 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जयभीम नगरातील 55 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा 19 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तीन मृत्यूंसह घाटीत आजपर्यंत 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 39 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
Leave a comment