औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्हयास 46 हजार 858 मेट्रीक टन एवढ्या खताचा पुरवठा झाला आहे. याशिवाय जिल्हयात यापुर्वीची खते शिल्लक असुन खतांचे उत्पादन व वाहतूक अत्यावश्यक सेवा म्हणून सुरळीतपणे चालु असल्याने खतांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर आगामी खरीप हंगामात खते व बियाणे यांचा शेतकर्यांना पुरवठा व नियोजनासाठी 19 मे रोजी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी श्री आनंद गंजेवार, जिल्हा उपनिबंधक दाभशेडे, तंत्र अधिकारी श्री प्रशांत पवार, माफदाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, आरसीएफ कंपनीचे विभागीय व्यवस्थापक श्री डेकाते व जिल्हा व्यवस्थापक जाकिर शेख, इफको कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक श्री कुलकर्णी, माफदाचे सचिव प्रकाशचंद मुथा तसेच डीएमओ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, औरंगाबाद जिल्हयास मे अखेर 60815 मे.टन इतक्या आवटंनाच्या तुलनेत आजअखेर 46858 मे.टन खतांचा पुरवठा झाला आहे. यामध्ये युरीया 15779 मे.टन, संयुक्त खते 18406 मे.टन, एसएसपी 8139 मे.टन, एमओपी 4011 मे.टन व डीएपी 524 मे.टन खतांचा समावेश आहे असल्याचे सांगूण जिल्हाधिाकरी पुढे म्हणाले की लॉक डाऊन असल्याने मध्यंतरी काही रेक येण्यास व हाताळणीसाठी वेळ लागला असल्यामुळे युरीया वगळता इतर खतांचा आवटंनाप्रमाणे पुरवठा झाला आहे. पुढील 12 दिवसात युरीया खताच्या पाच रेक उपलब्ध होणार असुन कृभको व नॅशनल फर्टिलायझर लि. या कंपन्यांच्या दोन रेक पुढील दोन ते तीन दिवसात जिल्हयात येणार आहेत. तसेच जून मध्ये सुध्दा युरीयासह इतर खतांच्या रेक सतत उपलब्ध होतील याबाबत नियोजन व संनियत्रंण तसेच पाठपुरावा कृषि विभागाकडून करण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
Leave a comment