प्रत्येक नागरिकांची होणार थर्मल स्क्रिनिंग
सोयगाव । वार्ताहर
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोयगांव शहरात सोयगांव नगरपंचायतच्या वतीने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर आपल्या दारी या अभियानास सोमवार दि.18 रोजी सुरुवात करण्यात आली. या अभियानात शहरातील प्रत्येक नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,सोयगावचे तहसिलदार प्रविण पांडे, युवानेते अब्दुल समीर, जि.प.उपाध्यक्ष एन.जी.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजू राठोड, प्रभाकरराव(आबा) काळे, जिल्हा परिषद सभापती मोनाली राठोड, तालुका कृषी अधिकारी अरविंद टाकणखार,शिवसेना सोयगाव तालुका प्रमुख दिलीप मचे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.शंकर कसबे, सोयगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन तामखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,पं.स.सभापती रस्तूलबी पठाण, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, डॉ.डी.डी.पाटील, आर.एस.पवार, उस्मान पठाण, कृष्णा राऊत,नगरपंचायतचे कार्यलय अधिक्षक भगवान शिंदे,राजेंद्र जंजाळ,सारंग बागले,राजेश मानकर, आरोग्य सेविका आदींची उपस्थिती होती.
Leave a comment