नगराध्यक्षांनी तहसीलदारांना दिले निवेदन
खुलताबाद । वार्ताहर
संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असुन सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे. परंतु यावर्षी मे महिन्यात पवित्र रमजान महिना सुरु असल्याने खुलताबाद येथील नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.
कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन सुरु असुन किराणा माल, मेडिकल, भाजीपाला आणि दूध विक्री केंद्र वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. तसेच खुलताबाद शहरात सर्व दुकाने बंद असल्याने मोलमजुरी,रोजंदारी करणार्या आणि हातावर पोट असणार्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या प्रसंगी आज खुलताबाद नगर अध्यक्ष ऐड.एस.एम.कमर यांनी तहसीलदार राहुल गायकवाड यांना निवेदन देऊन विनंती केली की, आपली नियमावली नुसार खुलताबाद शहरातील विविध दुकाने चालु करण्यास परवानगी देण्यात यावी आणि कोरोना संसर्ग कारणीभूत ठरतील अशा दुकांना परवानगी देऊ नये. तसेच कोणते दुकान कोणत्या वारी चालु ठेवाची व कोणत्या वारी बंद ठेवायची यांचा निर्णय आपल्या स्तवरावर घेऊन दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी जेणे करुन नागरीकांची गैरसोय होणार नाही.या वेळेस नगर अध्यक्ष एस.एम.क़मर यांच्यासह नगर सेवक मिर्झा अब्बास बेग, शेख इमरान, जुबेर लाला, नईम मोहम्मद बक़्श उपस्थित होते.
Leave a comment