कुंभार समाजातील मूर्तीकरवर उपासमारीची वेळ येऊ शकते
खुलताबाद । वार्ताहर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर बंदी घातली आहे.यामुळे कुंभार समाजातील मूर्तीकारावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पीओपी मूर्तींवर बंदीची अंमलबजावणी मागे घेण्याची मागणी कुंभार समाज महाराष्ट्र प्रादेशिक सामजिक संस्थेचे युवा प्रदेशअध्यक्ष संजय जोरले यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊनच्या काळ आणि गणेशोत्सवाला केवळ 100 दिवस राहिले असताना.अशा वेळी आलेला हा निर्णय गणपती मूर्तिकारांवर उपासमारीची वेळआणणारा आहे. कुंभार समाजात आणि गणेशमूर्तिकार यांच्यात दोन भिन्न मतप्रवाह आहेत. महाराष्ट्रातील मुर्तीकाराना मागणी जास्त असल्याने पीओपी शिवाय सोपा व आकर्षक असणारा पर्याय आजतरी उपलब्ध नाही. कुंभार सामाजिक संस्थेने अनेकवेळा शासनास पटवून दिलेले आहे की पीओपी ला शाडूमाती हा पर्याय होऊ शकत नाही, पीओपी मूर्ती आकर्षक व हाताळण्यास सोपी जाते. याउलट शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी अधिक जागा आवश्यक असते; मुर्तीचे सर्व भाग सुटे करून जोडावे लागतात,तसेच या मूर्ती सुकण्यासाठी जास्त वेळ लागतो, दुसरे असे कि शाडू मातीच्या मूर्तींना किंचित धक्का बसला तरी ती तुटते.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे मूर्तिकरांपुढे नवीन आव्हान उभे राहिले आहे. एवढ्या कमी दिवसांत मातीच्या मूर्ती कशा तयार करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवण्याचे काम गेल्या सहा महिण्यापासून सुरू झाले. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करून पीओपीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. पीओपीवर आता बंदी आल्यास मोठे नुकसान सहन करावे लागेल. म्हणून राज्य सरकारने पीओपीवरील बंदीची अंमलबजावणी मागे द्यावी अशा मागणीचे पत्र कुंभार समाज महाराष्ट्र प्रादेशिक सामजिक संस्थेचे युवा प्रदेश अध्यक्ष संजय जोरले यांनी मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. गणेशोत्सवाला जेमतेम 100 दिवस उरले आहेत. इतक्या कमी काळात शाडूच्या मूर्तीची निर्मिती करणे अशक्य आहे. लॉकडाऊनमध्ये कच्चा माल मिळणे शक्य नाही पुढील वर्षी यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढता येई शकतो.
Leave a comment