जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना । वार्ताहर
जालना शहरातील एका खाजगी दवाखान्यातील तीन कर्मचार्यांचे व एका कर्मचार्यांच्या कुटुंबातील निकट सहवाशीतातील एका व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल तसेच मुंबई येथुन परतलेल्या व मुळचा शिरनेर ता. अंबड येथील रहिवासी असलेला 41 वर्षीय पुरुष रुग्णाच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेकडुन दि. 20 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली. जिल्ह्यात एकुण 1872 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 53 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 915 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 161 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1688 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -05 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 41 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1482, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 267, एकुण प्रलंबित नमुने -161 तर एकुण 862 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या -2, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 767 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-18, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -574, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-18, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -53, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -01, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1266 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 199 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 7466 असे एकुण-7665 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-2728, मध्यप्रदेश -782, बिहार 160, तेलंगणा- 27, राजस्थान-167, झारखंड - 30, आंध्रप्रदेश-103, ओरिसा- 113, छत्तीसगड- 10, हैद्राबाद-08 असे एकुण-4128 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे. कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 574 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-26, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-22,पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -115 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-04, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-46, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -102, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-12, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे - 45, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-37, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-33 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 610 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 115 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 590 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 90 हजार 100 असा एकुण 3 लाख 16 हजार 908 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परराज्यातील मजुरांना त्यांच्याराज्यात जाण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत एस.टी. महामंडळाच्यावतीने मोफत बससेवा जालना येथील बसस्थानकातुन पुरविण्यात येत आहे. तसेच जालना येथुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात पायी जाणार्या लोकांसाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या पुढकाराने जालना शहरातील खासगी शाळांच्या बसेस अधिगृहीत करुन जालना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. परराज्यात किंवा महाराष्ट्राच्या परजिल्ह्यात जाणार्य नागरिकांनी बसस्थानक, जालना येथे संपर्क साधावा. यासाठी समन्वयक म्हणून इंडस बालकामगार प्रकल्पाचे मनोज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
Leave a comment