अनाधिकृतपणे गैरहजर राहणार्या वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई करणार-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना । वार्ताहर
रुग्ण सेवेबाबत कसल्याही प्रकारची हेळसांड किंवा दुर्लक्ष होणार नाही, याची सर्व वैद्यकीय अधिकर्यांनी दक्षता घेऊन सर्वांनी एकत्रितपणे व एकसंघपणे पुढाकार घेऊन काम करावे. तसेच अनाधिकृतपणे गैरहजर राहणार्या वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांची आढावा बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी अधिकार्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगांवकर, संपर्क अधिकारी डॉ.संतोष कडले, अति.जिल्हा चिकित्सक, एस.पी.कुलकर्णी, डॉ.जगताप यांच्यासह सामान्य रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकार्यांची उपस्थिती होती. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकार्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र, बालरोग, रेडिओलॉजी, मेडिसिन विभागातील डॉक्टर्स उत्कृष्ट काम करत असुन त्यांच्याप्रमाणेच इतर अधिकार्यांची काम करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिल्या.
Leave a comment