गुटखामाफियानी लढविली शक्कल
जालना । वार्ताहर
अंबड तालुक्यातील जामखेड, रोहिलागड येथील कानिफनाथ आश्रमातील मयत झालेल्या पुजार्याच्या खोल्याचा ताब्यात गुटखा माफियांनी घेऊन गुटखा साठवणूक करून त्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता,हि माहिती अंबडचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना मिळताच त्यांनी त्यांच्या सहकार्याला सोबत घेऊन काल दि.19 रोजी रात्री प 2 वाजेच्या सुमारास या आश्रमातील एका खोलीवर पोलिसांनी धाड टाकून झडती घेतली असता, त्या खोलीत विविध गुटख्याचा मोठा साठा आढळून आला.हा गुटखा साठा जामखेड येथील गुटखामाफिया अनिल भोजने याच्या मालकीचा असल्याचे कळताच त्याच्या घरावरही पोलिसांनी धाड टाकली.यावेळी दोन्ही धाडीत सुमारे 12 लाख रुपये किमतीचा 46 पोते गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
रोहिलागड शिवारातील कानिफनाथ आश्रमाचे साधक व पुजारी असलेल्या पती-पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यामुळे हा आश्रम बंद होता.मयत पुजारी दाम्पत्य हे गुटखामाफियाचे नात्याने मावशी व मावसा होते, त्यामुळे त्याने या आश्रमातील काही खोल्या ताब्यात घेऊन त्याचा गोडाऊन म्हणून उपयोग करीत होता.कारवाईपूर्वीच गुटखा माफिया फरार झाला आहे.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपअधीक्षक सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोहेकाँ. विष्णू चव्हाण पाटील, पोलीस कर्मचारी संदीप पाटील, संदीप कुटे, संतोष वणवे, महेंद्र गायके, शमीम बर्डे, वंदन पवार, स्वप्नील भिसे, विशाल लोखंडे, परवीन शेख यांनी कामगिरी केली.
Leave a comment