साठ रुपयाची बाटली दोनशे रुपयात घेतो पण तळीराम आपली हौस च करतो
विदर्भातील चांडोळ, मेरा चौकी येथुन आणली जाते दारु
जाफ्राबाद । वार्ताहर
लॉकडाऊन व संचारबंदी काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दारु दुकानावर बंदी घातली असली तरी जाफ्राबाद शहर व जाफ्राबाद तालुक्यातील वरुड बु येथे विदर्भातुन छुप्या मार्गाने देशी दारु आणुन खुलेआम चढ्या दराने अवैध दारु विक्री केली जात आहे. जाफ्राबाद अहिल्याबाई होळकर चौक येथे ही दशा पायाला मिळत आहे. होळकर चौकात संध्याकाळी पाच वाजेनंतर तळीरामाचा धुमाकूळ राहतो लागडाऊनचा फायदा घेत अवैध धंद्यावाले एरवी 60 रुपायाला मिळणारी देशी दारुची 180 मिलीची बाटली तब्बल 200 ते 250 रुपायाला विक्री केली जात असल्याने या अवैध धंद्यावाल्याने कळस गाठला आहे.विशेष म्हणजे संचारबंदी असतांना परवानाधारक दारुचे दुकान पुर्णताःबंद असले तरी येथील भारज बु चौकामध्ये सायंकाळ दरम्यान यात्रेचे स्वरुप येत असल्याने संचारबंदी नियमाचे उल्लंघन करुन सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडविला जात आहे.या प्रकारामुळे गावातील नागरीकांना तळीरामाचा मोठा त्रास सहन करावा लागत असुन पोलीस प्रशासनाने आवैध दारु विकणार्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
कोरोना या विषाणुने थैमान घातले असुन खबरदारी म्हणुन सर्वत्र लाँकडाऊन संचारबंदी लागु करण्यात आली आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद करण्यात आली असली तरी तालुक्यातील अनेक गावात विदर्भातील चांडोळ,मेरा चौकी,येथुन अनेकांनी चोरी चोरी चुपके चुपके अवैध देशी दारु आणुन दारु विक्रीची दुकाने थाटली आहे.रात्री च्या वेळेस या दुकानाच्या परीसरामध्ये तळीरामांची चांगली गर्दी असते.त्यामुळे संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन होतना दिसुन येत आहे.विशेष म्हणजे संचारबंदीचा व लॉकडाऊनचा फायदा घेत अवैध दारु विक्रत्यांनी ऐरवी 60 रुपायाला मिळणारी 180 मि.ली. देशी दारुची बाटली तब्बल दोनशे ते आडीशे रुपायाला विक्री करत आहे.त्यामुळे कमी वेळेत आधीक कमई होत असल्याने अनेक नागरीकांनी हा व्यवसाय सुरु केला आहे.काही व्यवसायीक तर मोबाईलवर संपर्क साधुन व्यवसाय करीत असुन तळीरामाना योग्य त्या ठिकाणी बोलवुन दारु विक्री करीत आहे. जालना जिल्ह्यात दारु विक्रीस बंदी असतांना देखील खुलेआम सर्रास आवैध दारु विक्री केले जात असल्याने हे पोलीस प्रशासनासाठी आहवान ठरत आहे. पोलीस प्रशासन हे दिवस रात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात तैनात असल्याचा फायदा घेवुन सर्रास अवैध दारु विक्री केली जात आहे. विक्री करण्यात येणारी दारु बनावट असल्याचे बोलल्या जात आहे.तरी प्रशासनाच्या वतीने ही बाब गांभीर्याने घेऊन अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.
Leave a comment