जालना । वार्ताहर
अतिरिक्त औद्योगिक वसाहत भागातील एका अवैध गुटख्याच्या गोडाऊनममधून वाहनातून भरून बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती सूत्रा कडून प्राप्त होताच अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी पथकासह आज दि 20 मे रोजी सकाळी त्या गोडावूनवर धाड टाकली असता 50 लाखाचा मुद्देमाल प्राप्त झाला तो गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे
पोलीसांनी गोडाउनची झडती घेतली असता गोडाऊनमध्ये व तिथे उभ्या असलेल्या तीन पीकअप टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा होता. याठिकाणी उभी असलेली एक ब्रेंझा कार, दोन मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. यावेळी गोडाऊनमधून टेम्पोमध्ये गुटखा भरणारे दोन ताब्यात घेतले तर अन्य काही लोक पळून गेले. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह पथकातील कर्मचारी प्रदीप घोडके, विशाल काळे, शिवाजी डाखुरे, ज्ञानेश्वर केदारे कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment