आतापर्यंत 401 रुग्ण बरे होऊन घरी
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1076 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), जटवाडा रोड (1), हिमायत बाग (1), किराडपुरा (4), पुंडलिक नगर (1), मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), जयभीम नगर (1), संजय नगर (1), रहिम नगर (1), कैलास नगर (1), गादल नगर (1), सादात नगर, गल्ली नं. 6 (4), शिवनेरी कॉलनी (1), विधिया नगर, सेव्हन हिल (1), गल्ली नं. 25, बायजीपुरा (5), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (1), मकसूद कॉलनी (2), जाधववाडी (1), गल्ली नं. 23, बायजीपुरा (2), गल्ली नं. 3, बायजीपुरा (1), सातारा गाव (3), आदर्श कॉलनी, गारखेडा (3), गारखेडा परिसर (1), मित्र नगर (1), मिल कॉर्नर (1), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (1), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (1), रहेमानिया कॉलनी (1), अन्य (4) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 महिला व 36 पुरुषांचा समावेश आहे.
एसआरपीएफ जवानांवर यशस्वी उपचार
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बंदोबस्तावरून परतलेल्या औरंगाबादच्या सातारा परिसरातील राज्य राखीव पोलिस बलाच्या (एसआरपीएफ) कोरोनाबाधित झालेल्या जवानांपैकी 64 जवानांवर यशस्वी उपचारानंतर आज ते बरे होऊन घरी परतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) तिघा जणांना डिस्चार्ज दिल्याने जिल्ह्यातील आजपर्यंत 401 रुग्ण बरे झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. सातारा परिसरातील जवानांना अजून सात दिवस घरातच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्यावर सातारा परिसरातील श्रेयश इंजिनिअरिंग महाविद्यालयात उपचार सुरू होते.
घाटीतून तीन कोरोनाबाधितांना डिस्चार्ज
घाटीतून आज तीन कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये संजय नगरातील दोन महिला (वय 68, 60) व बायजीपुरा गल्ली क्रमांक एकमधील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. सध्या घाटी रुग्णालयात 78 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 71 जणांची स्थिती सामान्य तर सात जणांची स्थिती गंभीर आहे.
घाटीमध्ये दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
हिमायत बाग येथील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा 19 मे रोजी मध्यरात्री 12.20 वा, हर्सूल येथील 63 वर्षीय पुरुष या कोरोनाबाधित रुग्णांचा सकाळी दहा वाजता घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिमायतबाग येथील रूग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब, हर्सुल येथील रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारही होते. आजपर्यंत घाटीमध्ये 33, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 36 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
Leave a comment