औरंगाबाद । वार्ताहर
सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामिण कार्यालयामार्फत ऑनलाईन फसवणूकीतील 2 लाख 46 हजार 410 रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी औरंगाबाद ग्रामिण यांनी प्रसिद्धीपत्राद्वार दिली आहे.
सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामिण यांच्या कार्यालयाकडे दि.1 मार्च 2020 ते आजपर्यंत औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या एटीएम,केडिट कार्ड तसेच ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारातील प्राप्त तक्रारींमध्ये सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामिण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी 15 तक्रारदारांची 246410 रुपयांची रक्कम तक्रारदारास परत मिळवून दिली आहे.यामध्ये एटीएम,क्रेडीट कार्ड व ओटीपीची माहिती व युपीआय लिंक शेअर केल्याने फसवणूक झाली होती.
नागरिकांनी आपले एटीएम, क्रेडिट कार्ड व ओटीपी क्रमांकाची माहिती कोणालाही सांगू नये.कुठल्याही लिंक शेअर करुन नये तसेच कुठल्याही कॅशबॅक सारख्या आमिषाला बळी पडू नये.असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण येथे संपर्क करावा,असे आवाहन मोक्षदा पाटील,पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण, यांनी केले आहे. सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक घुगे, पोलीस उपनिरिक्षक विवेक जाधव, यांच्यासह सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामिण कार्यालयाच्या पथकामार्फत करण्यात आली असल्याचे जनसंपर्क अधिकारी,औरंगाबाद ग्रामिण यांनी प्रसिद्धीपत्राद्वार कळविले आहे.
Leave a comment