भराड़ी । वार्ताहर

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाचे संकट आधिक गडद होत चालले आहे, असा आरोप भाजप पदाधिकार्‍यांनी केला आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असून राज्य सरकराने तातडीने पॅकेज जाहिर करुण आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका भाजपने तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. स्वतःच्या फायद्याचे राजकारण केले जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या खायाचे वांदे असतांना सरकार मात्र मर्जीतल्या अधिकार्‍यांच्या बदल्यात मग्न आहे. जनतेसाठी रखरखत्या उन्हात खडा पहारा देणार्‍या पोलिसांवर हल्ले केले जात आहे. पण मतांवर डोळा ठेऊन सरकार मुंग गिळून गप्प आहे. कोरोनामुळे शेतकर्‍यांचा मालाला भाव नसल्याने पडून आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना मदत करण्याऐवजी केंद्र सरकारकडे बोट दाखवत राज्य सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे. परराज्यातील मजुरांच्या हालअपेष्टांना ही राज्य सरकार जबाबदार  असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे.  कोरोनाशी दोन हात करणार्‍या डॉक्टरांना पीपीई किट, भरड धान्य खरेदी केंद्र सुरु करुण शेतकर्‍यांचा माल हमी भावाने खरेदी करावा, शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशा विविध मागण्या ही करण्यात आलेल्या आहे. निवेदनावर प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, माजी नगराध्यक्ष किरण पवार, मनोज मोरेल्लु, कमलेश कटारिया आदींच्या सह्या आहेत.

कापूस खरेदीत व्यापार्‍यांचे भले

लॉकडाऊनमुळे कापूस घरात पडून असल्याने  सीसीआयने कापूस खरेदी सुरु केली आहे. परंतु यात ही शेतकर्‍यांचा कापूस कमी व व्यापार्‍यांच्या गाड्या आधिक मोजल्या जात आहे. कापूस खरेदीत सावळा गोंधळ सुरु असून व्यापार्‍यांचे भले केले जात आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.