आष्टी । वार्ताहर
कोरोनाच्या संकटामुळे आपल्या मुळ गावाकडे परतलेल्या व्यक्तींना गावात प्रवेश देण्यापुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे वैद्यकीय तपासणी करून त्यांना होमक्वारंटाईन किंवा गावातील शाळा व समाज मंदिरामध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आली आहे. रायगव्हाण येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करण्याची जबाबदारी स्विकारुन गावचे सरपंच परमेश्वर केकान, उपसरपंच शिवदास पोटे , ग्रामसेवक व्हि.एस.ठोके पोलिस पाटील आगळे तसेच ग्रामपंचायत सदस्य उत्तम डोळसे व राजेभाऊ पोटे, संदीपान पोटे, प्रदीप पोटे, गोवर्धन केकाण, विष्णू पोटे, आदिंनी कोरोणा विषाणू चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे लक्ष दिल्याचे आढळून आले.
Leave a comment