शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांची मागणी
सावळदबारा । वार्ताहर
सोयगाव तालुक्यातील रवळा जवळा जामठी परिसरात 14 मे रोजी संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने तर वादळी वारा सुटल्याने घरावरील पत्रे उडले होते तर शेतक-यांचे शेतातील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खाली पडली आहेत नुकसान झालेल्या केळीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते व शेतकरी करित आहेत.
14 मे रोजी संध्याकाळी झालेल्या जोरदार पाऊस झाल्याने जवळा शिवारातील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले केळी खाली पडली आहेत अजूनही पंचनामे करण्यात आले नाहीत रवळा,जवळा,जामठी,भागात वादळी वा-यासह पाऊस झाल्याने काही ठिकाणचे झाड पडले होते तर घरावरील पत्रे उडले होते जवळा शिवारील शेतकरी भगवान देवराम मानकर यांच्या शेतातील केळीचे नुकसान होऊन खाली पडली आहेत त्यामुळे नुकसान झालेल्या केळीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते व शेतकरी करित आहेत.
प्रतिक्रिया-: सोयगाव तालुक्यातील जवळा शिवारात जोरदार पाऊस व वादळी वारा सुटल्याने येथील शेतक-यांचे शेतातील केळीची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खाली पडली त्यामुळे नुकसान झालेल्या केळीचे पंचनामे करण्यात यावे गुलाबराव पाटील कोलते शिवसेना उप तालुका प्रमुख सोयगाव.
Leave a comment