तळीराम माघाडी दारू पिऊन भागवित आहेत आपली हौस
पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र परिसरात काही अवैध दारू विक्रेते ब्लॅकने दारूची विक्री करीत असून दुप्पट ते तिप्पट भावात नागरिकांना दारू दिलेल्या जात आहे्. नागरिकांची दारुसाठी पायपीट चालले असून त्यांची गल्लोगल्ली भटकंती होत असल्याचे चित्र सध्या परिसरात पहावयास मिळत आहे. जादा दराने होणार्या दारू खरेदीमुळे दररोज वाद-विवाद होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काहीचे तर संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र सदरील पारध पोलीस स्टेशन या बाबीकडे कानाडोळा करीत असल्याची चर्चा महिलावर्ग मधून ऐकावयास मिळत आहे.
ज्यादा दराने तर दारूची खरेदी होतेच परंतु त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सध्या जिल्ह्यात दारूबंदीचे आदेश असतांना मात्र शेजारील विदर्भातील धाड हे गाव अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असल्याने तिथून बर्याच प्रमाणात दारूचे बॉक्स दररोज पिंपळगाव परिसरात येऊन धडकत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदीची तळीरामांनी पुरती वाट लावली असून तळीराम समोर होऊन लोकांसोबत विणाकारण वाद घालत आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. परिसरात दारूची हजारो रुपयाची उलाढाल होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. पोलिसाकडून दारु विक्रेत्यावर कारवाई होत असली तरी काही दारू विक्रेते हम करे सो कायदा याप्रमाणे खुलेआम तर कधी छुप्या पद्धतीने दारू विक्री करताना दिसत आहे. सध्या कोरणाच्या या महामारी विषाणुच्या संक्रमणाने चांगलाच कहर केला असुन कोरोणाचा फैलाव थांबवण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती्. तरी देखील काही दारू विक्रीते त्यांचा फायदा घेत तळीरामांना मनमर्जी दराने दारूविक्री करीत आहे ्दरम्यान 51 रुपयाला मिळणारी दारूची बाटली सध्या पिंपळगाव परिसरात तळीराम 150 रुपये देऊन आपली नशा भागवण्यात धन्यता मानत आहे. असे विदारक चित्र सध्या परिसरात पाहावयास मिळत आहे. तर काही कडून दारूची साठवणूक केली असून संचारबंदी व लॉकडाउन चा फायदा घेत नागरिकांना चढ्या दराने विक्री करित असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैधपणे होत असलेल्या दारूच्या विक्रीत संबंधित पोलिसांनी लगाम लावून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे
मिळणारी दारू बनावट तर नाही ना
परिसरातील तळीरामांना दारुसाठी भटकंती करावी लागत आहे. काही दारू विक्री चढ्या दराने दारूची विक्री करीत आहे. नागरिकाकडून जादा रक्कम वसूल करून जास्त फायदा उचलताना दिसत आहे. पण दारू विक्रीच्या कडून विकल्या जाणारी दारू बनावट तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे
Leave a comment