जाफ्राबाद । वार्ताहर
सर्व देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा कोविड च्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये कोविड चे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यूदर याच्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक 1 वर पोहोचलेला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या सर्व गोष्टींकडे होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष याचमुळे आज महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या जनतेची अशाप्रकारची दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यामध्ये प्रशासन नावाचं काही चीज अस्तित्वात आहे अशा प्रकारची भावना आता लोकांमध्ये उरलेली नाही. किंबहुना राज्य करणारे जे सत्ताधारी आहेत यांचं अस्तित्वच याठिकाणी जाणवत नाही आणि अशा प्रचंड मोठ्या संकटाच्या वेळेला राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वार्यावर सोडलं आहे अशा प्रकारची लोकांमध्ये स्वभाविक भावना निर्माण झालेली आहे. या सर्व बाबीमध्ये सर्वतोपरी अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारचा माननीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब (केंद्रीय मंत्री भारत सरकार) व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शक सूचनेवरून भारतीय जनता पार्टी तालुका जाफ्राबाद च्या वतीने तहसिलदार जाफ्राबाद यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.
देशातलं महाराष्ट्र हे आजच्या घडीला एकमेव राज्य आहे जे केवळ र्लेींळव-19 च्या संख्येमध्ये क्रमांक एक नाहीये तर आत्तापर्यंत राज्य सरकारने आपल्या जनतेकरता कुठल्याही स्वरूपाचं पॅकेज जाहीर केलेल नाही असं हे एकमेव राज्य आहे. कर्नाटक, हरियाणा, गुजरात, दिल्ली, केरळ या सर्वांनीच आपापल्या राज्यातील जनतेकरता काही हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले परंतु या सरकारने शून्य रुपयाचे पॅकेज जाहीर केले. रेशनवरच धान्य मोफत देणं तर सोडाच पण धान्य आठ रुपये आणि बारा रुपयाने त्या ठिकाणी दिलं आणि ते सुद्धा एप्रिलचे धान्य न देता मे महिन्यामध्ये हे धान्य द्यायला या सरकारने सुरुवात केली. व त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घोटाळे चालू आहेत. यामुळेच गरिबांचे निम्नमध्यमवर्गीयांचे, हातावर पोट असलेल्या लोकांचे अतोनात हाल चालू आहे याचा निषेध म्हणून हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात कोरोना च्या मुख्य योद्ध्यांना म्हणजेच डॉक्टरानां पीपीई किट वाटप ,कोरोना हॉस्पिटल निर्मितीसह डॉक्टर व पोलीस यांच्यावर होत असलेल्या जीव घेण्या हल्यांसोबतच त्यांना होत असलेली कोरोना विषाणूची बाधा या कडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे व कोट्यावधीच्या घोटाळ्यातील वाधवान कुटुंबाला संचार बंदीच्या काळात पर गावी जाऊ देण्यास परवानगी देणार्या अमिताभ गुप्ता यांना क्लिन चिट दिली. शहरातून येणार्या मजुरांना विलगीकरण केंद्राची भयावह स्थिती आहे तेथे जेवण ,पाणी अशा प्राथमिक सोईसुविधाचा पूर्ण पणे अभाव आहे आणि त्यासह कापूस /मक्का उत्पादन करणारे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे त्यांची अडचण दूर करण्यासाठी त्यांचा माल योग्य भावात खरेदी करावा त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई सुद्धा देण्यात यावे व शेतकर्यांना बिनव्याजी कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे व इतर राज्याप्रमाणे नाभिक समाज व चर्मकार समाज आणि इतर छोटे व्यावसाईक यांना 5000 रु.अनुदान द्यावे तसेच महाराष्ट्र राज्यासाठी विशेष पॅकेज लवकरात लवकर जाहीर करून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला धीर द्यावा असे या निवेदानात म्हटले आहे. यावेळी सुरेश दिवटे सर,संतोष पा.लोखंडे,विजय नाना परिहार,दगडुबा गोरे,भाऊसाहेब पा.जाधव, साहेबराव पा.कानडजे,जगन पा.पंडित,दिपक पा.वाकडे,राजेश पा.चव्हाण,विजय पा.परिहार,निवृत्ती दिवटे सर,सुधीर पाटील,डॉ.राजू साळवे,उद्धव पा.दूनगहू, शेख कौसर, अमोल पडघन,शरद शिंदे,लालसिंग देशमुख,अमोल पा.कोलते,गोपाल काळे इत्यादींनी जाफ्राबाद तहसीलचे तहसीलदार सोनी साहेब यांच्याकडे निवेदन दिले.
Leave a comment