भोकरदन । वार्ताहर
सीएम फंडात 23500 रुपयांची मदत जमा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषदचे आमदार म्हणून शपथ घेतली यांचा आनंदोत्सव फटाके फोडून ,बॅनर लावून साजरा न करता सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारी विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारला खारीचा वाटायची मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित यांनी 11 हजार तसेच शिवसेना शहर प्रमुख भूषण शर्मा यांची मुलगी चिमुरडी धनश्री भूषण शर्मा हिने देखील गल्ल्यात जमवलेले 11 हजार रुपये , गणपती सर्व्हिसिंग सेंटर चे मालक विनोद शिरोळे यांनी अकराशे रुपयांचा डीडी असा सर्व निधी भोकरदन येथील तहसीलदार संतोष गोरड यांचा कडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी सुपूर्द केला.
यावेळी महेश पुरोहित यांनी मनोगत व्यक्त केले की , हा आपला महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा नेतृत्वात कोरोनाचा संकटाशी लढत आहे त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या परीने छोटे मोठे योगदान द्यावे , वेळ प्रसंगी जर गरज पडल्यास मी माझी एक कीडणी गरजवंताला देऊन त्यातून काही पैसे मिळाले तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देईल असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष भूषण शर्मा , तहसीलदार संतोष गोरड , महेश पुरोहित , धनश्री शर्मा , आदी उपस्थित होते.
Leave a comment