गावात झाडे, घरे, छपरांवर ठेवल्या
परतूर । वार्ताहर
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसेंदिवस तापमान वाढ होत आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन यामुळे सर्वच हॉटेल तसेच विविध व्यवसाय पुर्ण ता बंद आहे. यामुळेे पशु पक्षांचे हाल होत आहेत.
पशु पक्षांचे होणारे हे हाल लक्षात घेऊन स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान परतुर व अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था वाटुर याच्या संयुक्त वाटुर परीसरात व परतुर येथील बालमित्र बालमैत्रीण विद्यार्थी च्या मदतीने जवळपास 50 गावात 145 युवक युवती गावातील घरोघरी मातीच्या कुंड्यात पाणी व ज्वारीच्या कणीस बांधून पशु पक्षांच्या पाण्याची सोय केली आहे. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे पक्षु पक्षी व वन्य प्राणी यांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन संस्था चे समन्वयक माधव हिवाळे सोमेश्वर सोनटक्के भास्कर साळवे , राजेश राउत, सुरेश बच्छीरे ,गणेश राऊत , सचिन चव्हाण ,आकाश आढे, उत्कर्ष मस्के संस्था च्या व तरुणांनी एकत्र येऊन स्वखर्चातून पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने माती पासून बनविलेल्या कुंड्या विकत घेऊन. या कुंड्यात पक्षांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळेल असे योग्य नियोजन करूण गावातील घरासमोर झाडे, घरे, छपरावर मातीच्या कुंड्या व ज्वारीचे दोन कणीस बांधण्यात आले आहेत. ग्रामस्थानीही या उपक्रमाला साथ देत नियमित कुंड्यामध्ये पाणी भरून ठेवत आहेत.
सध्या गावात मणुष्य चे हाल होते. पशु का सेवा म्हणुन संस्था च्या मध्यामातुन आम्ही गावात पशु पक्षासाठी पाण्याची व्यवस्था केली उत्कर्ष मस्के बालमित्र आपन सर्वजण घरात आहोत बाकी पशु प्राणी मोकळे आहेत ते मुक्त पणे संचार करीत आहे पण सध्या मोठ्या प्रमाणावर उन्ह वाढत आहे त्यामुळे मुक्या प्राण्यांची पाणी अन्न वाचुन हाल होत होते म्हणुन गाव पातळीवर बालमित्रच्या मदतीने पाणीची अन्न ची सोय करण्यात आली.
भाउसाहेब गुजाळ ,कार्यकारी संचालक स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान परतुर
सध्या परीस्थिती कोरोना मुळे सर्व लॉकडाऊन आहे. यातच पक्षाचे पाणी व अन्न मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे .
ही बाब लक्षात घेऊन आम्ही संस्था च्या वतीने बालमित्र बालमैत्रीण युवक युवती एकत्र करूण उपक्रम राबवित आहोत.
एकनाथ राऊत,अध्यक्ष अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था वाटुर
Leave a comment