औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद शहरात आज 60 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1022 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1), रोशन गेट (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 33 पुरुषांचा समावेश आहे.
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या मदनी चौकातील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा 17 मे रोजी सायं.सहा वाजता, पैठण गेट येथील 56 वर्षीय महिला रुग्णाचा 18 मे रोजी मध्यरात्री 12.30 वाजता आणि बुड्डी लेन येथील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा एकूण तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मागील चोविस तासात शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत घाटीमध्ये 31, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 34 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
सध्या घाटीत 72 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत असेही कळवले आहे.
Leave a comment