भराडी । वार्ताहर
सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे जनजीवन विस्कळीत होऊन ठप्प झालेले आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. जनतेला या त्रासातून मुंग्गी इतका का वाटा होईना असे मनात ठरवून त्यापासुन मनाला समाधान मिळावे याच उद्देशाने वांगी खुर्द येथील विशाल पाटिल मुरकुटे या तरुनाने मदतीचा हात पुठे करत एक आगळीवेगळी मदत केली.
या तरुणाने आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी उचलण्याचा चंग बांधून स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून खाजगी डॉक्टर्स आणि औषधोपचार करून या जीवघेण्या परिस्थितीमध्ये माणुसकीचे जिवंत उदाहरण घडवले. गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तिची तपासणी केली. कोरोना प्रतिबंधक म्हणून स्क्रिनिंग मशीनद्वारे आणि तज्ञ डॉक्टरांद्वारे कोरोनसदृश्य लक्षणांची तपासणी करण्यात आली. आणि सर्दी, खोकला, ताप व इतर काही आजार असेल त्या प्रमाणे सर्व रुग्णांना र्औषधीचे वाटप मोफत करण्यात आले आहे. नक्कीच अश्या प्रकारची ही आगळीवेगळी मदत इतरांनाही मदत करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. गोगे.डॉ संतोष शिरसाठ, डॉ.सुसुन्द्रे, डॉ जावेद पठाण,व गावातील उपसरपंच शेरखा पठाण, नामदेव पा मुरकुटे,सांडु पा महाकाळ, कोंडीबा पा. शेळके, रामू पा. सरोदे, पत्रकार आणि वृत्तनिवेदक प्रा. हबिबखान पठाण,मोबीन पठाण, अबरार शैख ,सुधाकर मुरकुटे.अविनाश दांडगे,आरोग्य कर्मचारी संतोष महाकाळ,संतोष दांडगे,हरीश दांडगे, गौतम भिवसने, समाधान महाकाळ, संतोष दांडगे, गणेश सोनवणे,सुनील मुरकुटे, सागर मोरे,राज दांडगे,सुदाम वीर,श्रीकांत दांडगे आदी लोकांनी परिश्रम घेतले.
Leave a comment