सोयगांव येथे ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शुभारंभ
सोयगाव । वार्ताहर
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी कृषी सेवा केंद्रावर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास तेथे गर्दी होण्याची शक्यता आहे.शिवाय लॉकडाऊनमुळे त्यांना दळणवळण साधनांची समस्या निर्माण होवू शकते त्यामुळे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसरकारने शेतकर्यांना आता बांधावर खते, बी बियाणे, कीटकनाशके अशा प्रकारच्या कृषी निविष्ठा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी निविष्ठा भरलेल्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा सोयगांव मध्ये शुभारंभ केला.
गावातील शेतकरी गट किंवा गट नसेल तर किमान 5 ते 10 शेतकरी एकत्र येवून त्यांना लागणारे खत, बी बियाणे या प्रकारचे कृषी निविष्ठा कृषी सहायक, कृषी मंडळ अधिकारी, तालूका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या कडे मागणी करणे आहे.या योजनेमुळे शेतकर्यांना बांधावर कृषी निविष्ठा मिळेल तसेच त्यांची आर्थिक लुबाडणूक होणार नाही असे स्पष्ट करीत या योजनेचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी केले. सोमवार दि.18 रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी यावेळी जि.प. अध्यक्षा मिनाताई शेळके, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार प्रविण पांडे, युवानेते अब्दुल समीर, जि.प.उपाध्यक्ष एन.जी.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजू राठोड, प्रभाकरराव (आबा) काळे, जि.प.सभापती मोनाली राठोड, रामू अण्णा शेळके, तालुका कृषी अधिकारी अरविंद टाकणखार,शिवसेना सोयगाव तालुका प्रमुख दिलीप मचे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.शंकर कसबे, मुख्याधिकारी सचिन तामखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,पं.स.सभापती रस्तूलबी पठाण,जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, डॉ.डी.डी.पाटील, आर.एस.पवार, उस्मान पठाण, कृष्णा राऊत, कृणाल राजपूत, गणेश खैरे, आदींची उपस्थिती होती.
Leave a comment