गोंदी पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन तासात अटक
तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील शिवाजी कासार हा गवंडी बांधकाम करण्यासाठी साडेगावात जात होता त्या वेळी तेथील एका मुलीशी त्याचे अनेक दिवसापासून प्रेम संबंध निर्माण झाले होते, शिवाजी हा काल साडेगावात एक लग्नात साठी आला असता त्याला आरोपीने एक शेतात नेऊन शेतात धारदार शस्त्राने मारहाण करून जागीच खून केला, ही घटना अंबड तालुक्यातील व गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दि.17 रोजी घडली असून शिवाजी कासार यांच्या खून प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड तसेच पोलीस उपनिरीक्षक गजानन कोसाळे सह पोलिस कर्मचार्यांनी दोन तासात आरोपी आकाश दगडू कांबळे संदीप ज्ञानदेव कांबळे यांना अटक करून जेरबंद केले.
सविस्तर माहिती अशी की साडेगाव येथील सचिन खोजे यांचे घराचे बांधकाम करण्यासाठी शिवाजी विश्वनाथ कासार हे एक वर्षापूर्वी साडेगाव येथे जात असताना तेथील एका मुलीशी प्रेम संबंध जुळले होते तसेच या प्रेमप्रकरणातून अनैतिक संबंधात जवळीक वाढली असल्यामुळे शिवाजी कासार यांना संबंधित मुलीच्या कुटुंब यांनी अनेक वेळा यापूर्वी धमकावून सांगून समज दिली होती तरीपण शिवाजी कासार हा विवाहित असतानाही मुलीच्या तिच्या सोडत नव्हता तसेच काल एका लग्नकार्यासाठी शिवाजी कासार आकाश कारके आकाश धोत्रे सुनील वाजे हे चौघे जण साडे गावात गेले असताना संबंधित आरोपीने धरलेला रागाचा वचपा आज काढायचा असे म्हणून शिवाजी कासार याला दोन्ही आरोपीने गावातून घेऊन बाहेरच्या उसाच्या शेतात नीले तेथे दोन्ही कांबळे आरोपीने शिवाजी कासार यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून जागीच खून केला संबंधित गेलेल्या कासार सोबत मित्राने शिवाजी का येत नाही कुठे गेला असेल तो त्या प्रेम संबंध मुलीसोबत तर गेला नाही असा कयास धरून सर्वत्र शोधाशोध केली पण शिवाजी मिळून येत नाही असे म्हणून कोणीतरी सांगितले शिवाजी कासारची देवरस मोटरसायकल उसाच्या शेतात जवळील आहे असे म्हणल्यावर तीर्थपुरी वरून आलेल्या कासार यांच्या नातेवाईक कुटुंबांनी व भाऊ ब्रिजेश कासार यांनी उसाच्या शेताजवळील गाडी सापडली पण शिवाजी शोध घेतला असता बाजूलाच मृत अवस्थेत आढळून आला याची खबर गोंदी पोलीस ठाणे व तीर्थपुरी पोलीस चौकीतील पोलिसांना देण्यात आली यावेळी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड तसेच पोलीस उपनिरीक्षक गजानन को साळे पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर खळेकर गोपनीय शाखेचे महेश तोटे पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण अविनाश पगारे मदन गायकवाड योगेश दाभाडे आदीसह पोलीस अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन गुन्हा दाखल केला व दोन तासातच साडेगाव येथील आरोपी आकाश दगडू कांबळे व संदीप ज्ञानदेव कांबळे दोन्ही आरोपींना दोन तासातच अटक करून जेरबंद केले आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कोसाळे करीत आहे.
Leave a comment