कुंभार पिंपळगाव नूतन वसाहत भागात अनोेळखी व्यक्तीस प्रवेश बंद
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव मध्ये रहदारी वाढली आहे .कोरोनाचे विषाणुचे संकट दिवसेन दिवस गडद होत आसताना देखील येथील बाजार पेठेतील गर्दी कमी होत नसल्याने चौथा लॉकडाऊनमध्ये लोक बाहेर जास्त पडत आहेत. बाजार पेठेचे गाव असल्याने येथे अत्यावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी, शेती साहित्य खरेदी खते मोटारपाईप आदी व आरोग्य सेवेसाठी मोठ्या संख्येने 30-40 गावातील नागरिक येत आहेत. त्यात पुणे-मुंबई आदिठिकांन वरून बाहेरून गावाकडे येणार्यांची संख्या वाढली आहे.
गावपातळीवर त्यांच्या विलगिकरणाची पुरेशी सुविधा कार्यकर्त्यांच्या मदतीने उपलब्ध करून घेतली पाहीजे. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे केवळ प्रशासन पुरे पडू शकणार नाही लोकसहभाग तेव्हढाच महत्वाचा आहे. म्हणुन कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कुंभार पिंपळगाव येथील नूतन वसाहत भागात खबरदारी म्हणुन अनोळखी व्यक्तीस येण्यास बंदी घालण्यात आली येथे गेट करण्यात आले असून या लॉकडाऊन मध्ये ओळखीच्या व या भागात राहणार्या नागरिकांचं येथे प्रवेश दिला जात आहे. आपण आपल्या वसाहतीची काळजी घेतलीच पाहिजे म्हनुन येथील रहिवाशांनी हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कॉलनी, वसाहत, गल्ली, नगर येथील नागरिकांनी अशा पध्दतीने उपाययोजना कराव्यात असे येथील नागरिकांनी म्हणटले आहे. वसाहातीत येण्यासाठी चेक पोस्ट केली आहे. यावेळी विष्णू शिंदे, पत्रकार अजय गाढे, डॉ.धेंडे, उत्तम शिंदे, चंद्रकलाबाई वक्ते आदीसह वसाहतीतील रहिवाशी उपस्थितीत होते.
Leave a comment