तालुक्यात मजुर कामगार मोठ्या संख्येने दाखल
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसांवगी तालुक्यातील मजूर व गोरगरीब कुटुंबांकडून मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याची मागणी समोर येत आहे नुकत्याच मुंबई, पुणे येथून आलेले उर्वरित कुटुंब मजूर कामगार यांना हाताला काम नाही आतापर्यंत रोजगार उपलब्ध झाला नाही गावाकडे येऊन मास्क सॅनिटायझरसाठी पैसे नाहीत खाण्या पिण्याचा प्रश्न आहे , मास्क व सॅनिटायझर वापरण्याची गरज असल्याचे शासन सांगत आहे.कोरोनाला आता घाबरून जायचं नाही त्याच्याशी लढायचं असा सांगितले जाते. तर आता साहित्य वाटप करण्याची गरज आहे.
तालुक्यातील हजारो लोक मजुरू साठी काम धंदा मिळावा म्हणुन गेले होते, ते आता परतले आहे. तालुक्यातील बेकारी खुप आहे. मुंबई, पुणे येथे ठिकाणाहून कामासाठी गेलेले मजूर कामगार वर्ग व तालुक्यातील सर्वसामान्य हालाकीची परिस्थितीत जीवन जगणार्या गोरगरीब कुटुंबांना सॅनिटायझर, मास्क वाटप करण्याची गरज आहे. आधीच मजूर वर्गाला काम धंदा नाही जीवन जगण्याचा गंभीर प्रश्न आहे त्यात हा सॅनिटायझर मास्क चा वेगळा खर्च गोरगरीब करू शकत नाहीत त्यामुळे शासनाने घनसावंगी तालुक्यात लक्ष देऊन सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात यावे. आता तालुक्यात मोठ्या संख्येने मंजुर कामगार, नौकरदार वर्ग आदिंसह सर्वच लोक जनतेची जिथे दाखल होत असल्याने आता घनसावंगी तालुका चिंता वाढली आहे त्यासाठी उपाययोजना म्हणून मास्क आणि सॅनिटायझर, हॅन्डवाशचे वाटप करण्यात यावे अशी मागणी गोरगरीब कुटुंब व कामगारांमधून होत आहे.
Leave a comment