भराड़ी । वार्ताहर
कोरोना कोविड 19 विषाणुच्या पाश्वभूमीवर डॉक्टर आपल्या दारी अभियानाला सुरुवात झाली असुन सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात वाडी-वस्तीवर जाऊन नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यात डॉक्टर आपल्या दारी या अभियानाला दिनांक 13 रोजी अंधारी येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला सुरुवात झाली.
या अभियानात पंचायत समिती,धन्वंतरी मेडिकल असोसिएशन,जनरल प्रॅक्टीशनर्स, असोसिएशन,व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने ंहे अभियान राबवले जात आहे.आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणार्या 42 गावांसह -वाडी वस्त्यांवर 78 हजार नागरिकांच्या थर्मल स्कॅनिंग द्वारे तपासणी करण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश राठोड यांनी दिली.22मे पर्यंत वाडी-वस्तीवर जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाणार असुन या मधे आरोग्य विभागाचे कर्मचारी,आशा वर्करस, अंगणवाडी सेविका यांचा सामावेश असल्याची माहिती सांगण्यात आली.
Leave a comment