औरंगाबाद । वार्ताहर
शहरात लॉकडाऊनच्या काळात वाहन चालकांकडून एक कोटींचा दंड पोलिसांनी वसूल केल्याचे समोर आले आहे. सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे यांनी ही माहिती दिली आहे. अनावश्यक फिरणार्या वाहनांवर कारवाई करून हा दंड वसूल झाला आहे.
शहरात लॉकडाऊनचे कडक पालन केले जात आहे. अनावश्यक फिरणार्या लोकांवर कारवाई करण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून शनिवारी दुपारपर्यंत 669 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रशासनाने लॉकडाऊनचे सक्तीचे पालन सुरू केले आहे. त्यात शहरात बाजार आता चार दिवसांसाठी कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. विनाकारण फिरणार्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. 48 ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले असून विनाकारण फिरणार्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी दुपार पर्यंत 669 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, 500 हून अधिक वाहने जप्त करून एक कोटींहून अधिके दंड वसूल केला आहे.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या संकल्पनेतून मोहल्ला कोव्हिड व्हॉलेंटिअर तयार करण्यात येत आहेत. 45 वर्षाच्या आतील 15 ते 20 जणांचा समावेश यात असेल. हे लोक आपल्या भागात लोकांना समजून सांगण्याचे काम करतील. त्या भागातील लोकांची तपासणी करण्यात मदत या लोकांची होऊ शकते. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त डॉ नागनाथ कोडे यांनी दिली. इतकंच नाही तर कन्टोन्मेंट भागातून अनावश्यक बाहेर येणार्या आणि आत जाणार्या लोकांवर कारवाई करण्यात येणार असून अशा लोकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Leave a comment