शहर पोलीस दलात खळबळ
औरंगाबाद । वार्ताहर
पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असतांनाच आज पोलीस मुख्यल्यातील महिला पोलीस कर्मचारीकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहतूक शाखा शहर विभागात कार्यरत असलेला कर्मचारी बंदोबस्तासाठी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात होता. या कर्मचार्यासह एका उपनिरीक्षकाच्या नेतृत्वात अकरा जणांचे एक पथक गाडे चौकात बंदोबस्ताला तैनात करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून कर्मचार्याला खोकला, ताप होता. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली . शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे यांनी तातडीने गाडे चौकातील बंदोबस्तावरील सर्व पथकाची तपासणी करण्याचा निर्णय घेत त्यांना क्वारंटाइन केले. या कर्मचार्यांच्या नातेवाईकांचे देखल स्वॅब घेण्यात येणार आहेत. या पूर्वी बाधित कर्मचार्याच्या घरात कोणाचाही अहवाल करोना पॉझिटिव्ह आलेला नाही. बंदोबस्तदरम्यान हा या कर्मचारी हा करोना रुग्णाच्या संपर्कात आला असावा, अशी शक्यता पोलिस कर्मचार्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पोलिस दलातील करोना पॉझिटिव्हची संख्या पाचवर पोहचली आहे.तर आज पोलीस मुख्यालयातील एका महिला पोलीस कर्मचारीकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलीस दलातील कोरोना रुग्ण संख्या सहा झाली असल्याने शहर पोलीस दलात खळबळ माजली आहे.
Leave a comment