जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी
जालना । वार्ताहर
साथरोग अधिनियम 1898 चे कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 च्या तरतुदीनुसार संपर्णु राज्यामध्ये 31 मे, 2020 पर्यंत राज्याचे मुख्य सचिव यांनी लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये जालना जिल्ह्यामध्ये 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असुन यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश 31 मे, 2020 पर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकुण 1718 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 33 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 871 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 63 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1429 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 25 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1337, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 259, एकुण प्रलंबित नमुने -63 तर एकुण 838 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-28, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 720 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-14, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -456, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-8, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -33, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -6, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 402 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-4450, बिहार-3027, मध्यप्रदेश-1041,राजस्थान-658, पश्चिमबंगाल-482, झारखंड-426, यासह उर्वरित 16 राज्यातील एकुण 11126 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 6191 अशा एकुण 17322 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 456 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-07, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-00,पोलीस प्रशिक्षण केंद्र-101, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-03, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-4, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -90, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -24, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे - 41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-45, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टे क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-27, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-14 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 589 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 105 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 583 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 83 हजार 200 असा एकुण 310008 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment