आष्टी । वार्ताहर
परतुर तालुक्रायातील रायगव्हाण मध्ये नागरिकांना स्वस्त भाव दुकाना मार्फत सुरळीतपणे धान्य वाटप करण्यात आले. ज्याअर्थी शासनाने कोरोणा विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा जारी केला आहे. गावामध्ये स्वस्त भाव दुकानामध्ये गर्दी होऊ न देता धान्य पात्र शिधा पत्रिका धारकांना सुरळीतपणे धान्य वाटप करण्यात आले. स्वस्त भाव धान्य दुकानदार यांनी धान्य उपलब्ध करून देतांना ग्राहकांना हात धुण्यासाठी सॅनिटायझर व साबन उपलब्ध करून दिले. तसेच धान्य खरेदी करतांना सुरक्षित अंतर राखण्यासाठी दुकानासमोर एक एक मिटरची वर्तुळे आखण्यात आली आहेत.
या दरम्यान स्वस्त भाव धान्य दुकानदार आसाराम पोटे व पर्यवेक्षक म्हणुन ग्रामसेवक व्हि.एस.ठोके यांनी मास्क व सॅनिटायझर चा वापर तसेच कोरोणा प्रतिबंधात्मक उपाय यावर माहिती दिली. धान्य वाटप दरम्यान लोकांची गर्दी होऊ नये म्हणून गावचे सरपंच परमेश्वर केकान, उपसरपंच शिवदास पोटे ग्रामपंचायत सदस्य राजेभाऊ पोटे, उत्तम डोळसे, प्रदिप पोटे आदिंची उपस्थिती होती.
Leave a comment