उत्पादन शुल्क विभागाचे पितळ उघडे
जालना । वार्ताहर
संपूर्ण देशात कोरोना आजाराने कहर केला असल्याने केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉक डाऊन ची घोषणा केले तेव्हा पासून मद्य प्रेमींना आपली भूक भागविणे कठीण झाले होते व शासनाचा ही महसूल कमी झाल्याने व दोन महिन्याच्या विश्रांती नंतर शासनाने आपला महसूल वाढविण्या साठी ऑनलाईन दारू विक्रीचा निर्णय घेतला होय परंतु जालना येथील उत्पादन शुल्क विभाग या कामी निषफल ठरल्याने मद्य प्रेमाना दारू विक्री च्या दुकाना समोर आज दुसरा दिवशी ही मोठी गर्दी केली होती आहे या मुळे उत्पादन शुल्क विभागाचे पितळ उघडे पडल्याचे दिसून आले आहे,
ऑनलाईन बुकींगमुळे जालना शहरातील मद्य प्रेमींनी बुकिंग केली आहे. मात्र प्रत्यक्षात चार-पाचशे रुपयाच्या दारूसाठी जालना शहराच्या दुसर्या कोपर्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही. ही देखील एक मोठी अडचण आहे. या दारू दुकानावर गर्दी झाल्यामुळे सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली होती. आज ते दुकान बंद आहे. मात्र अन्य तीन दुकानांवर मद्यप्रेमींची गर्दी आहे.
डाटा कलेक्शन मोठ्या प्रमाणात
दारू पिण्यासाठी परवाना लागतो हे बहुतांशी लोकांना माहीतच नाही. त्यामुळे आत्तापर्यंत कुठेही, कधीही, केव्हाही, दारू पिणार्यांची मोठी अडचण होत आहे. बार बंद असल्यामुळे घरी बसून पिण्यासाठी परवाना काढावा लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन परवाने काढल्या जात आहेत. या माध्यमातून दारू विक्रेत्यांकडे मोठे डाटा कलेक्शन होत आहे. हे डाटा कलेक्शन त्यांना वर्षभरासाठी ताळमेळ घालण्यासाठी सोपे जाणारे आहे. कारण दुकानातून विक्री झालेल्या दारूचा ताळेबंद देताना दारू कोणाला दिली, किती दिली, परवाना होता, का या सर्व बाबी राज्य उत्पादन शुल्क विचारतात आणि दुकानदार ज्यांच्या नावावर परवाने आहेत, अशांच्या नावावर ही दारुविक्री दाखवतो.यामध्ये बहुतांश वेळा ज्यांनी कधीही दारू घेतली नाही, मात्र परवाना काढलेला आहे, अशा परवानाधारकांच्या नावावर देखील बिल पाडले जाते. या दारु विक्रेत्यांकडे परवाना क्रमांक गेला तिथे कायम बिल पडत राहतात एवढेच नव्हे, तर बाहेरगावचे मद्यपी जालन्यात येऊन घेऊन गेले, असे म्हणत त्यांच्या नावावर देखील ही दारूविक्री दाखविली जाते आणि ताळमेळ घातला जातो.
Leave a comment